आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते वीरपुत्र निखिल म्हात्रे यांचा सत्कार; मानी भुते गावात सेवा निवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते वीरपुत्र निखिल म्हात्रे यांचा सत्कार; मानी भुते गावात सेवा निवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
मानी भुते, ता. अलिबाग : भारतीय सैन्यात २१ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले मानी भुते गावचे वीरपुत्र हवालदार श्री. निखिल राजाराम म्हात्रे यांचा सेवा निवृत्ती सोहळा शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी मानी भुते गावात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
दुपारी ३.०० वाजता त्यांचे मायभूमीत आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात त्यांचे जंगी स्वागत केले. संपूर्ण गावात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.
निखिल म्हात्रे यांचा जन्म ३० जून १९८५ रोजी मानी भुते गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंगणवाडी भुते येथे १ ली ते ४ थी पर्यंत झाले. त्यानंतर मानी भुते शाळेत ५ वी ते ८ वी, अलिबाग येथे ८ वी ते १० वी, तर जे.एस.एम. कॉलेज अलिबाग येथे ११ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण झाले.
दि. २६ जून २००६ रोजी ते भारतीय सैन्यात भरती झाले. कर्नाटक बेळगाव येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून ते १४ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल झाले. सलग २१ वर्षे सेवा बजावून दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ते हवालदार पदावरून सेवानिवृत्त झाले आणि आपल्या मायदेशी परत आले.
या काळात त्यांनी ग्वालियर मध्य प्रदेश , 9 पोस्ट सियाचीन (लेह-लडाख), सेला रोड (सिक्कीम), UN-Mission विदेश (दक्षिण आफ्रिका-सुदान,काश्मीर नंगि टेकडी ४१ आरआर कुपवाडा (जम्मू-काश्मीर), गांधीनगर (गुजरात), कारगिल, सोनमर्ग, जम्मू गलवान घाटीआणि आसाम हरचुरा अरुणाचल प्रदेश टायगर हिल अशा आव्हानात्मक ठिकाणी सेवा बजावली. कर्नाटक बेळगाव येथे नियुक्ती
या सोहळ्याला अलिबाग-मुरुड मतदार संघाचे आमदार माननीय श्री. महेंद्र दळवी साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी निखिल म्हात्रे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदारांनी त्यांच्या २१ वर्षांच्या देशसेवेचे, शिस्तीचे आणि धाडसाचे कौतुक करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला सहायक आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क श्री. सुहास पाटील, असिस्टंट कमिशनर पोलीस श्री. सुनील घासे, असिस्टंट कमिशनर पोलीस श्री. राजू पाटील, बँक ऑफ इंडिया (BOI) पुणे जनरल मॅनेजर श्री. संजय कदम, विस्तार अधिकारी पंचायत समिती अलिबाग सौ. श्वेता कदम , अलिबाग तालुक्यातील माजी सैनिक व निखिल म्हात्रे यांची पत्नी व त्याच्या दोन मुली व त्याचे आई-वडील आणि निखिल चा भाऊ व त्यांचे परिवार उपस्थित होते यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ मानी भुते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. व कार्यक्रम यशस्वी करण्यात महेश म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले



