0
4
8
2
9
0
विघ्नहर्ता
आले बाप्पा विघ्नहर्ता
तू सुखकर्ता, तू दुःख हरता
वाजत गाजत घरी आणतो
दरवाज्यावर तोरण बांधतो
बाप्पाचे आगमन होता
सुखाचा स्पर्श होतो
घर अगदी भारवून जाई
सकाळ, संध्या आरती होई
दहा दिवस कसे मजेत जातात
कामावर जायला पाय जड होतात
वर्षभर वर वाट बाप्पाची पाहतो
तुझ्यावर संकट सोडून बिनधास्त राहतो
बाप्पा तुझी मनोभावे पूजा
दुःखाला आयुष्यातून कर रे वजा
सुखाचा शिरकाव होऊ लागतो
कर्म कर चांगले बाप्पा वरून बघतो
दहा दिवस कसे जातात समजत नाही
पुढच्या वर्षाची वाट मी पाही
अंतःकरण भरते विसर्जन करताना
पापण्या जड होती तुला निरोप देताना
सुरेखा चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
========
0
4
8
2
9
0



