
0
4
8
2
5
1
माझा खाऊ
अहो आजोबा आजी
जरा लक्ष द्यावे इकडे
गरम गरम भजी खा
कागद द्या माझ्याकडे…!!
अहो काकू नि काका
झाले फुटाणे खाऊन
मग आता सारे कागद
टाका बरं मला देऊन…!!
अहो मामा नि मामी
खा खुशाल कॅडबरी
रॅपर आवडतात मला
नाही करत हो मस्करी..!!
अहो काका मावशी
गुलाब जामून प्लेट
खाऊन झाल्यानंतर
द्या पटकन मला भेट…!!
ऐका रे सर्व बाळांनो
आवडलेला खाऊ खा
बाग स्वच्छ ठेवण्यास
माझा खाऊ मला द्या…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
4
8
2
5
1



