Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरपरभणीपरीक्षण लेखसाहित्यगंध

“ऋणनिर्देश, आभाराचे दोन शब्द”; बी एस गायकवाड

आपणा सर्वांच्याच ऋणाईत राहणे पसंत करतो

0 4 8 2 9 7

“ऋणनिर्देश, आभाराचे दोन शब्द”; बी एस गायकवाड

आपणा सर्वांच्याच ऋणाईत राहणे पसंत करतो

मराठीचे शिलेदार’ समूहातर्फे परवा सकाळी ठीक ७:०८ मिनिटांनी राहुल दादांचा मॅसेज “तुमचा फोटो पाठवा”, क्षणाचाही विलंब न करता लागलीच दादांना फोटो पाठवला. आज सर्वोत्कृष्ट रचनेची वर्णी लागणार हे नक्कीच. पण दोन समूहात रचना लिहिल्या होत्या. पैकी कोणती रचना पोस्टर वर झळकणार याची आतुरता. तशा दोन्ही रचना त्याच आशयाच्या होत्या. ‘शेतकऱ्याची व्यथा’.

लिहावं तेवढं कमीच. कारण परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे आणि बऱ्याच ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे,शेतकऱ्याची व्यथाचं तशी झालीय. काही वेळातच समूह क्रमांक दोन क्रमांकाच्या समूहात लिहलेल्या रचनेचे पोस्टर समूहात झळकले. मनोमन आनंद झाला. कारण अतिवृष्टीच्या पावसामुळे आणि धरणांच्या सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे.नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे .वास्तव,विदारक,हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना प्रसंगांना रचनेत शब्दबध्द करण्याचा छोटासा प्रयत्न केला. आणि तो परिक्षकांना भावला.रचनेचे सार्थक झाले.

‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे आधारवड, मुख्य प्रशासक आदरणीय राहुल सर, मुख्य परीक्षक सविता ताई सह सर्व परीक्षक मंडळाचे मनःपुर्वक खूप खूप धन्यवाद.

मागील स्पर्धेच्या सप्ताहात सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेत ‘वादविवाद’,मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेत ‘चमन गोटी’,बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत ‘मुक्तीसंग्राम’ व शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेत ‘पात्र-अपात्र’, या चार ही रचनेस सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले होते. बऱ्याचदा इच्छा असूनही व्यस्ततेमुळे व्यक्त होता येत नाही. त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो.

माझ्या काव्यरचनेस सदोदित सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करत आलात. त्याबद्दल पुनश्च एकदा समुहाचे सर्वेसर्वा मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा, संस्थेच्या सचिव पल्लवीताई ,मुख्य परीक्षक सविताताई, तारका ताई, स्वातीताई, वृंदाताई, शर्मिलाताई, प्रशांत भाऊजी, संग्रामदादा, विष्णूदादा ,अशोकदादा सह सर्व परीक्षक टीम चे मनःपुर्वक खूप खूप धन्यवाद. तसेच समूहातील सर्व ताई दादांनी माझ्या रचनेस अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. अक्षरशः मी भारावून गेलो. तुम्हां सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असाच प्रेरक प्रतिसाद यापुढे ही राहील,या अपेक्षासह आपणा सर्वांच्याच ऋणाईत राहणे पसंत करतो…!!

कविवर्य बी एस गायकवाड
ता.पालम,जि.परभणी
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे