Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

साप्ताहिक साहित्यगंधचे संपादक ‘राहुल पाटील’ पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित

'साप्ताहिक महाराष्ट्र सपुत'च्या वर्धापन दिनी पुरस्काराचे वितरण

0 4 8 2 8 6

साप्ताहिक साहित्यगंधचे संपादक ‘राहुल पाटील’ पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित

साप्ताहिक महाराष्ट्र सपुत’च्या वर्धापन दिनी पुरस्काराचे वितरण

‘लोकशाहीचा चौथा स्तंभ सक्षम बनविण्यासाठी जनतेने पत्रकारांच्या पाठीशी असावे’; राहुल पाटील यांचे प्रतिपादन

आज वर्तमानपत्र प्रकाशित करणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. सर्वांनाच ही तारेवरची कसरत दिसत नसली तरी, प्रसार माध्यमात प्रामाणिकपणे काम करणा-या पत्रकार, बातमीदार, वार्ताहरांना याची कल्पना आहेच. शासन स्तरावर पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कुठलेही संघटन सक्षमपणे उभे नाही. वार्ताहरांना मानधन पुरेसे नाही. ग्रामीण पत्रकारितेवरच वर्तमानपत्र, साप्ताहिक व मासिकांचा पाया उभा आहे. परंतु यांची जाणिव आज तरी जनसामान्यांना नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिकाधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी जनतेने पत्रकारांच्या पाठीशी उभे असायला हवे, असे प्रतिपादन ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर व साप्ताहिक साहित्यगंधचे संपादक राहुल पाटील’ यांनी केले. प्रसिद्ध साप्ताहिक महाराष्ट्र सपुतच्या वर्धापनदिनी संपादक राहुल पाटील यांना पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान करून त्यांचा शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मराठी वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. याचे कारण सोशल मिडीया असून, प्रत्येक पत्रकारांनी अधिकाधिक अवांतर वाचन करून मराठी व्याकरणाचा अभ्यास करून बातमीचे शीर्षक द्यायला हवे. निष्पक्ष पत्रकारिता करतांना निर्भीडता अंगी असेल तरच पत्रकार हा समाजव्यवस्थेला आपल्या लेखणीतून न्याय देऊ शकतो.

नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, सांस्कृतिक सभागृह, उरुवेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे प्रसिद्ध ‘साप्ताहिक महाराष्ट्र सपूत’ ने पत्रकारितेची यशस्वी बारा वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने वर्धापन दिवस, लोगोचे अनावरण आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निष्पक्ष व निर्भीड पत्रकार आणि ग्राम स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच, सचिव, सामाजिक संस्था यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा.अनिल खडसे (IRS) उपायुक्त आयकर विभाग, मुख्य अतिथी मा.कुश मोटवानी (IAS) भारतीय प्रशासकीय सेवा, नागपूर तर प्रमुख पाहुणे मा. विनोद जीवतोडे (गुरुजी) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र सपूत संपादक मा.प्रविण अडागळे, मा.सेवकराम राऊत कार्यकारी संपादक, सहसंपादक मा. दिवाकर कडू, उपसंपादक मा.राजुभाऊ कांबे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

महामानवाच्या प्रतिमा पूजनानंतर विचारमंचावरील सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सपूतचे संपादक मा.प्रविण अडागळे यांनी आपल्या प्रास्ताविकात बारा वर्षाचा प्रवास तसेच आलेली संकटे, केलेला संघर्ष मांडला. सर्व पाहुण्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिल खडसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राज्यसेवा, भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करतांना वर्तमानपत्राची भूमिका विषद केली. ग्रामस्तरावर काम करतांना येणा-या अडचणींचा सामना करण्यासाठी अभ्यासपूर्ण निर्णय घेणे महत्वाचे असते असे अधोरेखित केले.

आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शहरातील निवडक
निष्पक्ष व निर्भीड पत्रकारांना ‘पत्रकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सत्कारमूर्तीमध्ये मा. राहुल पाटील संपादक ‘साप्ताहिक साहित्य गंध व बिनधास्त ब्यूज’, श्री चंद्रकांत भोयर, संपादक विदर्भ माझा, श्री-योगेश बावणे साप्ताहिक विदर्भ नंदन, श्री स्वींद्र नंदनवार संपादक दैनिक लोकराग, श्री सुभाष राऊत संपादक दैनिक चिरकाल सत्य, ‘इशिका धार्मिक प्रतिनिधी इंडिया न्यूज २८, श्री युवराज मेश्राम महाराष्ट्र संदेश न्यूज, श्री ततछछचचछणणपाडुरंग भोंगाडे साप्ताहिक निर्भीड, श्री रजत डेकाटे भिवापूर तालुका प्रतिनिधी मार्मिक, श्री ओंकार चेके संपादक प्रेस शक्ती यवतमाळ,श्री प्रदिप शेंडे संपादक विदर्भ कल्याण यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन अमित वाघमारे, मनिष अडागळे यांनी केले, तर आभार दिवाकर कडू यांनी मानले. याप्रसंगी शहरातील व ग्रामीण भागातील वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महाराष्ट्र सपूत परिवाराने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपले अमूल्य असे योगदान दिले.

मुख्य संपादक
साप्ताहिक साहित्यगंध

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे