Breaking
कवितानागपूरभंडाराविदर्भसाहित्यगंध

समजून कोण घेतेय?

वनिता गभणे आसगाव भंडारा

0 4 8 2 9 0

समजून कोण घेतेय?

वडाच्या पारंब्याशी
बाळ गोजीरे खेळतयं…
त्या मुळांना रुजण्यास
पाणी कोण मुरवतयं..?

विवेक- विचारी श्लोगन
भिंती कागदावर मिरवतयं..!
आचरणात आणायला
आज वेळ कुणा मिळतयं..?

जिथे खाल्ले, तिथेच टाकले
आजही हेच घडतयं..!
हाकेच्या अंतरावरील
कचरापेटी कचऱ्याविना झुरतयं..!

खणखण नाणे- नोटांनी
देवाची दाणपेटी भरतेयं..!
कुठे कुडाच्या चार भिंतीना
वादळ- वारा छळतोयं..!

धनिकाच्या पंगतीतील अन्न
नाली- गटाराला भरवतयं…
झोपडीतील गरिब बिचारा
अर्धपोटी भुकेत मरतोयं..!

आत्मकेंद्री मनु मन आज
स्वार्थी झुल्यावर झुलतेयं…!
दुज्या जीवाच्या भावनांना
इथे समजून कोण घेतेय…?

वनिता गभणे
आसगाव भंडारा
=============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे