Breaking
आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणे

आज ‘नागपंचमी’

नागपूजा विशेष माहिती जाणून घेऊ या

0 4 8 2 9 3

आज ‘नागपंचमी’

नागपूजा विशेष माहिती जाणून घेऊ या

वसुधा नाईक,पुणे

नागपंचमीला नागाचे अनन्यसाधारण महत्च आहे. आपण घरात नागाच्या प्रतिमेची पूजा करतो. काही स्त्रिया वारूळाला पूजनासाठी जातात. लाह्या दूध याचा नैवैद्य अर्पण करतात. ‘नाग शेतकर्‍याचा मित्र आहे’. आणि काही धार्मिक परंपरा आहेत.यातील हा एक दिवस नागांच्या पूजनेचा ‘सर्पयज्ञाच्या सांगतेचा दिवस’. या दिवशी आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून जनमेजय राजाने सर्पयज्ञ करणे थांबवले आणि आस्तिक ऋषींनी विश्‍वातील सर्व नागांना अभय दिले.

नागाच्या पूजनाचे महत्त्व

शिवाने जेव्हा हलाहल विषाचे प्राशन केले तेव्हा त्याला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले आणि त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत. त्यांच्या पूजनाने चैतन्यलहरींना धारण करणार्‍या समुहाचेच पूजन होते.

पूजनाचा विधी

या दिवशी गारुडी लोक नाग आणतात. त्याची पूजा करून त्याला दूध देतात. घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी वाहातात.

याच बरोबर स्त्रिया मुलीहातावर छान मेंदी काढतात. छान छान कपडे घालून अलंकार घालतात.फेर धरतात. फुगड्या घालतात. शाळेत देखील हा उपक्रम साजरा करतात.

‘चल ग सये वारूळाला’
‘नागोबाला पूजायला

वसुधा नाईक,पुणे

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे