Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

ज्योतीची सावू

सविता धमगाये, नागपूर

0 4 8 2 8 6

ज्योतीची सावू

रांधा वाढा उष्टी काढा
यातच रमली बाय ती
लेकरं खेळवत अंगावर
जगणं विसरली आय ती

चूल आणि मुलांपुरते
सामावले होते विश्व
ज्योतीच्या सावूने मात्र
उधळले ज्ञानाचे अश्व

हात धरून बालिकेचा
बसवले जेव्हा वर्गात
क ख ग घ गिरवतांना
स्वप्नांचे विमान थेट स्वर्गात

दिन दलितांच्या हक्कासाठी
सावू वण वण फिरली
गेले जोती सोडून तरी
ही सर्वांना पुरून उरली

जोतिबाचे उरले कार्य
जिद्दीने तडीस नेण्यासाठी
नाही केली पर्वा जीवाचीही
लढली बालगोपाला साठी

अशी आई सावित्रीमाई
लढली सदैव दुसऱ्यांसाठी
लढता लढता देह टाकला
कार्य राहीले कितीतरी पाठी

सविता धमगाये, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे