
0
4
8
2
9
3
श्रावणधारा
लपंडाव विजांचा नभी
बरसल्या श्नावणधारा
कधी ऊन कधी पाऊस
मध्येच मंद मंद हा वारा
सर पावसाची आली धावून
चिंबचिंब झाली सारी धरणी
आसमंती मृदगंध दरवळला
सूर पाखरांचे पडले कानी
बरसून गेल्या श्नावणसरी
बहरून आली सृष्टी सारी
तन मन झाले ओले चिंब
निसर्गाची किमयाच भारी
अवचित आल्या श्नावणधारा
वृक्ष वेलींना फुटले धुमारे
सृष्टीवर मग साज चढवला
हिरवेगार झाले शिवार सारे
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल जि.चंद्रपूर
=======
0
4
8
2
9
3



