Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणमहाराष्ट्रमुंबई

राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 7

राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे सुयश

भूगोल प्रज्ञाशोध केंद्र, नवी मुंबईचे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: भूगोल प्रज्ञाशोध केंद्र, नवी मुंबई यांच्यावतीने दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भुगोल प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
या परीक्षेत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे इ. ५ वी ते इ. १० वी चे ९८ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी ८७ उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल ८८.७८ % लागला आहे.
भूगोल प्रज्ञाशोध केंद्र, नवी मुंबई यांच्या तर्फे परीक्षेत विद्यालयातून अंजली संदीप भगत [ इ.९ वी अ ] ही विद्यार्थीनी १०० पैकी ९२ गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिला गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र तसेच अनुज चेतन गावंड [ इ. १० वी अ ] हा विद्यार्थी १०० पैकी ८८ गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याला सिल्व्हर मेडल व प्रशस्तीपत्र आणि कार्तिकी अभय पूरो [ इ. १० वी अ ] ही विद्यार्थीनी १०० पैकी ८६ गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिला ब्राँझ मेडल व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांना राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा हा उपक्रम यशस्वीरीत्या व पारदर्शकपणे राबविल्या बद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
भूगोल विषय शिक्षक आशिष राणे सर यांना विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन व भूगोल विषयाची रुची निर्माण करण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सक्रीय सहकार्याबद्दल तसेच परीक्षा समन्वयक म्हणून उत्कृष्टरीत्या जबाबदारी पार पाडल्याबद्दल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन *उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्कार – २०२४* प्रदान करण्यात आला. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा हा उपक्रम विद्यालयात गेली ११ वर्षे यशस्वीपणे राबविला जात असून आशिष राणे सर यांना उपक्रमशील भूगोल शिक्षक हा पुरस्कार ६ वेळा मिळाला आहे.

मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, भूगोल विषय शिक्षक आशिष राणे सर व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ. सा. धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे