0
4
8
2
9
3
शिकवणी
शिकवणी बाबा ! कशी मी विसरू ! !
पोरकं लेकरू ! तुम्हाविना !!
आदर्श जीवन ! आचार विचार !!
नित्य सदाचार ! वर्तनात !!
दिव्य दूरदृष्टी ! काळजी जनाची !!
आशा ना धनाची ! बिलकुल ! !
उद्धारण्या कुळ ! कर्मनिष्ठा भारी ! !
पंढरीची वारी ! मनोभावे !!
वारकरी बाबा ! सत्याचीच भक्ती ! !
अंर्तयामी शक्ती ! निष्कलंक !!
शिकवणी बाबा ! दिपस्तंभ वाटे !!
हुंदका हा दाटे ! स्मृतीशेष !!
संपला उत्साह ! निरूत्साही मन ! !
निरर्थक धन ! बाबांविना !!
कृष्णमेघ नभी ! आभाळ फाटले !!
दुःख हे दाटले ! अंतरंगी !!
गेली तत्परता ! अभंग पोकळी! !
उदास पाकळी ! पुतळाच !!
याल का फिरून ! शिकवणी देण्या !!
परीक्षा ती घेण्या ! लेकराची !!
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
===============
0
4
8
2
9
3



