ई-पेपरकवितानांदेडमराठवाडासाहित्यगंध
मखमली स्वप्न
0
4
8
2
9
7
मखमली स्वप्न
पहाटेची ती साखरझोप
गोधडी उबदार अंगावर
रंगलो मखमली स्वप्नात
नव्हतो मुळीच भानावर
काय करावं गुणगान तिचं
चंद्राची नाजूक ती चंद्रकोर
कमनीय बांध्याची अप्सरा
झालो पाहूनच मी सैरभैर
खाणाखुणांची तिची भाषा
खळी गाली स्मितहास्याची
आडंग बदलून घेत होतो
मजा ही मखमली स्वप्नाची
का लाजते सांग सखे तू
साध माझ्याशी जवळीक
खुलवू फुलवू प्रेमाचा बगिचा
झुलेल प्रेमहिंदोळा आपसूक
पहाटेच्या वेळचे हे स्वप्न
स्वप्न स्वप्नच नको रहावे
मिठीत यायचं मला तुझ्या
शपथ ते सत्यात उतरावे
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
7



