Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकिय

वीज कंत्राटी कामगारांचे तीव्र आंदोलन

मा.चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन

0 4 8 2 9 0

वीज कंत्राटी कामगारांचे तीव्र आंदोलन

मा.चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेरही आमरण उपोषणाचा इशारा

अमृता खाकुर्डीकर पुणे प्रतिनिधी

पुणे – 20ऑ(प्रतिनिधी) महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या वतीने कंत्राटी कामगारांनी आज पुण्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या “महात्मा सोसायटी” तील घरासमोर निदर्शने केली.

ही संघटना गेले अनेक दिवस आंदोलन करीत असून शासनाने मात्र अद्याप या प्रश्नाची दखल घेतलेली नाही, म्हणून मंत्रीमहोदयांच्या घरासमोर आंदोलन तीव्र स्वरूपात करण्याचा प्रयत्न झाला. आणि या पुढची पायरी म्हणजे, आंदोलनाकडे असेच दुर्लक्ष झाले व मागण्या मान्य झाल्या नाही तर, येत्या २४ ऑगस्ट पासून नागपूर शहरात थेट ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांने दिला आहे.

कंत्राटी कामगार पद्धत कायम स्वरूपी बंद करून पूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना शासन मान्यता प्राप्त रोजंदारी कामगार पद्धती राबवली जात होती, (Nominal Muster Roll) त्याच पद्धतीने महावितरण- महापारेषण व महानिर्मिती कंपनीत विविध पदावर कार्यरत कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा व त्यांना रिक्त पदांवर सेवेत सामावून घ्यावे, ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे. यासाठी हरियाना राज्याच्या धर्तीवर ” कौशल्य विकास निगम” ची स्थापना करून कंत्राटी कामगारांना कंत्राटदारांच्या विळख्यातून मुक्त करून शाश्वत रोजगार द्यावा, ही मागणी धोरणात्मक निर्णय अंतर्गत येणारी बाब म्हणून शासन दरबारी बरेच वर्ष प्रलंबित आहे. या मागणी बाबत मा. ऊर्जामंत्र्यांनी राज्यात निवडणुकपूर्व आचारसंहिता लागण्याआधीच ठोस निर्णय घेऊन कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.

या वेळी भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री – बाळासाहेब भुजबळ, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे उपमहामंत्री राहूल बोडके, संघटन मंत्री ऊमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. उमेश विस्वाद, निखिल टेकवडे, वैभव कामठे, अश्विनी भिलारे, किरण हंचाटे, विजया भगत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. परंतु मंत्री महोदयांची भेट होऊ शकली नाही म्हणून अंदोलकांनी स्विय सहायकांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनास भारतीय मजदूर संघाचा पाठींबा असून या विषयात कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे