0
4
8
2
9
4
आयुष्य कसे जगावे …!
गुलाबाला पण वाटतं असेल
या काट्याविना फुलावं
एकाच फांदीवरच्या इतरांशी
थोडंशी तरी जुळावं
सर्वांच्या नजरेआड जाऊन
कधीतरी मनसोक्त वाढावं
मनातल्या काही गोष्टी….
त्या फुलपाखरांची तरी बोलावं
झालेल्या वेदनांचा विचार
एकदातरी सोडावं,
सतत घडणारे तेच क्षण
काहीसे तरी बदलावं
अन् आयुष्य असे जगावं
ज्यात दुःख कधी नसावं.
धनश्री माशाळकर
सर परशुराम कॉलेज ,पुणे
0
4
8
2
9
4



