Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबई

संत फ्रान्सिस झेवियर हायस्कूल येथे सुपेरियर जनरल फादर नाझरेत यांची सदिच्छा भेट

सिलवासा प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

संत फ्रान्सिस झेवियर हायस्कूल येथे सुपेरियर जनरल फादर नाझरेत यांची सदिच्छा भेट

दादरा नगर हवेली: येथील संत फ्रान्सिस झेवियर हायस्कूल दुधनी दादरा नगर हवेली येथे आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी सोसायटी ऑफ मिशनरीज ऑफ संत फ्रान्सिस झेवियर अर्थात पिलार फादर्सचे गोवा येथून आलेले सुपेरिअर जनरल रेव्हेंट फादर नाजरेथ फर्नांडिस व प्रोविन्सशियल सुपेरियर रेवरेंट फादर डायगो गामा यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली .

प्रार्थना सभेत उत्कृष्ट आयोजना ने अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुंदर अशा संगीताची प्रस्तुती केली. शाळेचे मॅनेजर फादर सिलवेस्टर यांनी फादर नाझ रेथ यांचा तर मुख्याध्यापक फादर वॉल्टर यांनी फादर डायगो यांचा शाल व सप्रेम भेट देऊन सत्कार केला .

आपल्या मार्गदर्शन पण भाषणात सुपेरिअर जनरल फादरांनी शाळेच्या कामाचे कौतुक केले तसेच शाळेचा दर्जा अधिक उंचावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा सामना करत असताना सर्वांनी एकत्रितपणे काम करावे व पिलार संस्थेचा नावलौकिक मोठ्या करावा यावर सुपेरिअर जनरल फादरांनी भर दिला या छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी फादरांची वाहवा मिळवली.

त्यानंतर शिक्षकांसोबतच्या बैठकीत सुद्धा फादरांनी सर्व शिक्षक हे आम्हा संस्थेसाठी अतिशय जवळचे असून तुमच्या कामानेच संस्थेचा विकास होतो तेव्हा सर्वांनी मनापासून काम करावे व संस्थेचा नावलौकीक वाढवावा असे आव्हान केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक फादर वॉल्टर डिसूझा यांनी फादरांचे शाळेच्या वतीने आभार मानले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे