Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमराठवाडासाहित्यगंध

मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती आभारीय शब्दसुमने; बी.एस.गायकवाड

स्पर्शगंध मनाचा' हा काव्यसंग्रह प्रकाशित

0 4 8 2 9 0

‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती आभारीय शब्दसुमने; बी.एस.गायकवाड

‘स्पर्शगंध मनाचा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत ‘भास आनंदाचा’ या माझ्या काव्य रचनेस सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले. त्यापूर्वी मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेत देखील सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बालकाव्य वाटते तेवढे सोपे नाही . याची प्रचिती लिहितांना येते.कारण स्वतःला बाल मनात घेऊन जावं लागतं आणि ते तितकं सोपं नसतं.तरीपण समूहात खूप जण निपून आहेत. काही शीघ्र कवी, कवयित्री आहेत. सलाम त्यांच्या बालकाव्य लिखाणास.

पाहू आपणही प्रयत्न करून, म्हणून दोन तीन वेळेस मी प्रयत्न केला. आणि दोन वेळेस सर्वोत्कृष्ट बालकाव्य म्हणून सन्मानित करण्यात आले. तसे समूहात आल्यापासून भरपूर भरभरुन मिळाले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी माझा ‘स्पर्शगंध मनाचा, हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, हे केवळ आणि केवळ राहुल दादामुळे. पूर्ण श्रेय राहूल दादा आणि ‘मराठीचे शिलेदार’ टीमला देतो. माझे काव्यसंग्रह प्रकाशनाचे स्वप्न साकार झाले.सदैव ऋणाईत मी.

‘मराठीचे शिलेदार’ समुहामध्ये आल्यापासून सर्व काव्य प्रकारात लिखाणाची नियमावली माहीत होऊन लिखाणाची संधी मिळत गेली. तसे भरपूर काव्य लेखन करण्यात आले. आणि सन्मानपत्राने ही सन्मानित झालो आहे. ही केवल समूहाची देन आहे. मराठीचे शिलेदार समूह टीम मधील सर्व ताई, दादा, प्रामुख्याने मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक आदरणीय राहुल सर, सचिव पल्लवी ताई,मुख्य परीक्षक आ. सविताताई, आ. वैशालीताई,आ. तारकाताई, स्वातीताई, शर्मिलाताई, वृंदाताई, सुधा ताई, संग्रामदादा, विष्णू दादा, अरविंद सर, हंसराज खोब्रागडे सर, अशोक लांडगे सर, आपणा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. तसेच माझ्या रचनेस प्रसंगोपात प्रेरणा देऊन प्रेरीत करणारे व लिखाणाचे बळ वाढविणारे समूहातील सर्व कवी, कवयित्री, ताई, दादा आपणा सर्वांचे पुनश्च खूप खूप धन्यवाद.

बी एस गायकवाड
पालम,परभणी
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे