
0
6
4
5
5
9
नवदुर्गाची नवरात्री आली
त्रिशूल हाती नंदीवर स्वारी
प्रथम दुर्गा शैलपुत्री आली
जपमाळ कमंडलू तपमूर्ती बनून
द्वितीय दुर्गा ब्रम्हचारिणी आली…!!
चंद्रघंटा भाळी सिंहारूढ योद्धा
तृतीय दुर्गा शक्ती चंद्रघंटा आली
अष्टभुजा सृष्टीनिर्माती तेज अपार
चतुर्थ दुर्गा कृपाळू कूष्मांडा आली…!!
स्कंद मांडीवर वात्सल्यमूर्ती
पाचवी दुर्गा स्कंदमाता आली
सिंहारूढ शत्रूनाशक महिषासूरमर्दिनी
सहावी दुर्गा कात्यायनी आली…!!
श्वासातून अग्नीज्वाळा दुष्टांना भस्म करी
सातवी दुर्गा कालरात्री आली
श्वेत वस्त्र परिधानी शिवासाठी तप
आठवी दुर्गा महागौरी आली…!!
भक्तांना ज्ञान मोक्ष सर्व सिद्धिंची दात्री
नववी दुर्गा सिद्धिदात्री आली
भक्ती शक्तींचा उत्सव घरोघरी
नवदुर्गाची हो नवरात्री आली..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जि बीड
0
6
4
5
5
9



