Breaking
देश-विदेशनागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकिय

अमृतसर ( पंजाबला) उद्याच्या महाअधिवेशनाला ओबीसी समाजबांधव हजेरी लावणार

नागपूर प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

अमृतसर ( पंजाबला) उद्याच्या महाअधिवेशनाला ओबीसी समाजबांधव हजेरी लावणार

नागपूर: जिल्हा व ग्रामीण मधून दोन हजार ते अडीच हजार ओबीसी समाजबांधव रवाना झाले. यावर्षी नव्वे ९वे महा अधिवेशन अमृतसरला गुरुनानक देव विद्यापीठ .गोल्डन जुबली कन्वेंशन सेंटर सकाळी ११ते ५ दरम्यान घेण्याचे ठरले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय महागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा.हंसराज अहिर यांच्या शुभहस्ते होणार आहे . या महा अधिवेशनात ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या रेटून धरणार .१) ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.२) आरक्षणाचे 50% ची अट रद्द करण्यात यावी.३) शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी. ४)महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावे .५) सरकारी व निमसरकारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात प्रमुख मागण्या राहणार आहेत.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, विरोधी पक्षनेते मा. विजय वडेट्टीवार,मा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष शेषराव येलेकर, सहसचिव शरद वानखेडे कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, समन्वयक अशोक जीवतोडे, महिला अध्यक्ष सुषमाताई भड, केंद्रीय सदस्य एडवोकेट रेखाताई बाराहाते. सुभाषजी घाटे, परमेश्वर राऊत, डी के आरीकर, विलास कोळसे, पुंडलिक आरीकर, किशोर शिवणकर, भैय्याजी रडके, माधुरीताई आरीकर, सुनंदाताई कोळसे, कल्पना आरी कर, कल्पना शिवणकर, राम रतन देशमुख इत्यादी ओबीसी समाज बांधव उपस्थित राहतील. अशी माहिती केंद्रीय कोषाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ श्री गुणेश्वर आरीकर यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे