0
4
8
2
9
0
नियती
कधी आपल्याच अपयशावर
आपण उगाच कन्हत असतो
आणि नियतीने डाव साधला
असेच आपण म्हणत असतो.. //
उलट थोड्याफार यशाचेही
श्रेय स्वतःकडे घेत असतो
नियती वगैरे शुद्ध बकवास
सोयिस्कर फाटा देत असतो.. //
अनपेक्षित वा धक्कादायक
हाच नियतीचा डाव असतो
तोंडचा घास हिरावला जाणे
नियतीचा वर्मी घाव असतो… //
अधर्मी अत्याचारी वृत्तीचा
नक्कीच दुर्धर अंत असतो
आत्महत्या करणारा हिटलर
नियतीचाच संकेत असतो.. //
आत्मनजरेत अपराधीपण
हाच पुरावा ग्राह्य असतो
जशी करणी तशीच भरणी
हा नियतीचा न्याय असतो //
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
0



