अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) तर्फे सांविधान चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन
नागपूर शहर प्रतिनिधी
अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) तर्फे सांविधान चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि १२): अंगणवडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) नागपूरच्या वतीने अध्यक्षा मायाताई ढाकणे यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे दुपारी 1 वाजता केन्द्र सरकारने कामगार कायदे रद्द करुन 4 श्रमसंहिता केल्या त्याविरुध्द देशातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन संप करीत आहोत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 12 फेब्रुवारी गरुवार रोजी एक दिवस धरणे आंदोलन करीत आहोत.
1) कामगारांनी केन्द्र सरकारशी लढून मिळविलेले कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता केल्या, त्या 4 श्रमसंहिता त्वरीत रद्द करण्यात याव्यात.
2) सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका मदतनिस यांना कर्मचारी संबोधले व त्यांना कामगार कायदयाचा फायदा देण्यासाठी पात्र ठरवले. परंतु शासन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला जुमानत नाही व निवृत्त सेविकांना लाभ नाकारत आहे. आमची प्रमुख मागणी आहे की, अंगणवाडी सेविका मदतनिस यांना निवृत्ती पश्चात पेन्शन दिली जावी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन 26000/- देण्यात यावे. तसेच प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधनामध्ये वर्ग करण्यात यावा.
3) पर्यवेक्षीकाच्या रिक्त जागा अंगणवाडी सेविका यांच्या पदोन्नती कोटयातील जागा त्वरीत भरण्यात याव्या.
4) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाहय कामे देवू नये.
5) मोबाईल रिचार्ज चे पैसे वाढवून देण्यात यावे.
या व इतर मागण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी किसनाताई भानारकर, मनिषा पाटील, कल्पना अतकरे, ज्योर्तीगीता देशभ्रतार, ढवळेताई, जयश्री लोखंडे, मीना गजभिये, रागीणी भांगे, उषा हाडके, मंदा बैरागडे, सूव सत्पेडा मदत विशाखा भोसकर, माधुरी फुलझेले, कविता साखरकर, प्रतिभा रामटेके, शुभांगी गोरे यांनी धरण आंदोलनात सर्व सेविका मदतनीस सहभागी होत्या. असे उज्वलाताई नारनवरे मुख्य सचिव यांनी सांगितले.



