बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये शिक्षक पालक सभा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी रायगड
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये शिक्षक पालक सभा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी रायगड
अलिबाग: मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये शिक्षक पालक संघाच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ सत्रात इ. ११ वी, इ. १२ वी मधील तर दुपार सत्रात इ. ५ वी ते इ. १० वी मधील विद्यार्थ्यांच्या शिक्षक व पालकांच्या सभा स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या.
दोन्ही सत्रात शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ च्या शिक्षक पालक संघासाठी प्रत्येक वर्गातून पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली आणि शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. निवड झालेल्या वर्ग प्रतिनिधी पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दोन्ही सत्रात वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांनी पालकांना आपला परिचय करून दिला. दोन्ही सत्रात सभेमध्ये शिक्षक व पालक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने चर्चा केली. पालकांनीही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने आपली मते मांडली.
सकाळ सत्रात मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगती बाबत पालकांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती करीता राबवित असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. कैलास शिकारे सर यांनी सभेचे प्रास्तविक व सुत्रसंचलन केले. तसेच त्यांनी एच. एस. सी. परीक्षा २०२४ च्या निकालाचे वाचन केले व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत शाळा राबवित असलेले विविध उपक्रम व उपाय योजना याबाबत पालकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. धनराज फड सर यांनी पालकांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
दत्तात्रेय अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत शाळा राबवित असलेले विविध उपक्रम व उपाय योजना याबाबत पालकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सभेचे आभार प्रदर्शन केले. दुपार सत्रात मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी सभेचे प्रास्तविक केले तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगती बाबत मार्गदर्शन केले व शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमांची पालकांना माहिती दिली.
आशिष राणे सर यांनी एस. एस. सी. परीक्षा २०२४ च्या निकालाचे वाचन केले व इ. १० वी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत शाळा राबवित असलेले विविध उपक्रम व उपाय योजना याबाबत पालकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. सचिन भंडारे सर यांनी पालकांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. सुनिल मोरे सर यांनी पालकांना शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. पल्लवी पाटील मॕडम यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत मार्गदर्शन केले.प्रियंका राणे मॕडम यांनी पालकांना खेळांचे महत्व सांगून क्रीडा विषयक मार्गदर्शन केले.
साधनव्यक्ती प्रशांत ठाकूर सर यांनी शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष अजित नाईक सर यांनी सभेचे सुत्रसंचलन तर दिव्या भगत मॕडम यांनी सभेचे आभार प्रदर्शन केले.



