
0
4
8
3
0
2
परीचे गाव
आकाशात आहे परीचे गाव
पक्ष्यांपरी उडत उडत जाई
ढगांसंगे खेळे इंद्रधनूवर स्वार
किती गोजीरी सुंदर परी बाई
फुलपाखरापरी बागेमध्ये येई
कधी रानीवनी कधी डोंगरावरी
आईची लाडकी चिमुकली परी
रोज रोज विहरते गगनावरी
इवली इवली परी राणी
दिसते किती नाजूक छान
हातात छडी पांढरा फ्राक
दोन पंख इवले इवले कान
चांदण्यांमध्ये खूप खूप रमते
चंदूमामाशी गुजगोष्टी करते
परी राणीचा आहे किती थाट
मौजेने उडते खुदकन हसते
चंद्राचा प्रकाश लुकलुकते तारे
झुळझुळ वारा निसर्गाचे दान
ढगांची गर्दी निळाशार आकाश
परीचे गाव आहे किती छान
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
========
0
4
8
3
0
2



