Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणे

आहिल्याबाईंचे अंतरंग उलगडणारे नाट्य- “देवी”

रसिकांच्या प्रतिसादाने रंगला नाटकाचा शुभारंभ

0 4 8 2 9 3

आहिल्याबाईंचे अंतरंग उलगडणारे नाट्य- “देवी”

रसिकांच्या प्रतिसादाने रंगला नाटकाचा शुभारंभ

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे.दि.5 (प्रतिनिधी) शासन आणि प्रशासन कसे कौशल्याने चालवावे याचा आदर्श वास्तूपाठ घालून देणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तिनशेवी जन्मशताब्दी सध्या सर्वत्र विविध उपक्रमांद्वारे साजरी होत आहे. अशाच एका उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘स्नेह ‘ नाट्यसंस्थेने ‘देवी’ या एकल नाट्याची निर्मिती केली. शुभारंभाचा प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पुणेकर रसिकांसमोर नुकताच सादर करण्यात आला.

संस्कार भारतीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोथरूडला एमईएस सभागृहाच्या मंचावर प्रस्तुत झालेल्या या प्रयोगास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डाॅ. प्रविणजी दबडघाव, अखिल भारतीय दृश्यकला संयोजक श्री. रवींद्र देव, पुणे महानगर संस्कार भारतीचे अध्यक्ष, पं.अतुलकुमार उपाध्ये आणि मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य, डॉ. रवींद्र वैद्य यांची विशेष उपस्थिती होती.

मंचावर उभारलेल्या फक्त दोन चौकटी आणि मोजक्या लेव्हल्सचा वापर करून आहिल्यादेवींच्या राज्यात घेऊन जाणा-या या नाट्याचे लेखन- दिग्दर्शन योगेश सोमण यांनी प्रभावीपणे केले आहे. नेपथ्याची बाजूही श्री. सोमण यांनीच सांभाळली आहे.

या एकल नाट्याची संकल्पना वेधक आहे. आहिल्याबाईंची भूमिका साकारणा-या स्त्री कलाकाराला त्यांच्या जीवनचरित्राबद्दल पडणारे प्रश्न आणि ती उत्तरं देण्यासाठी स्वतः आहिल्यादेवीचं अवतरणं, यातून देवींचे अंतरंग उलगडत नेले आहे. चौंडीतले बालपण; मल्हारराव होळकरांची सून म्हणून जीवनाला मिळालेली कलाटणी, पुढे पती निधनानंतर राज्यकारभाराची जबाबदारी, मनात निर्माण झालेली विरागी भावना, शासनकर्ता म्हणून अनेक कठीण प्रसंगाला धीराने तोंड देणे, अशी विवाधांगी मांडणी करीत फुलत नेलेल्या या एकल नाट्यात रश्मी देव यांनी आपल्या अभिनयाचे रंग भरून एकटीच्या ताकदीवर आहिल्यादेवींचे दमदार चरित्र आणि अलौकीक व्यक्तीमत्वं जिवंत साकारले आहे.

हा अविष्कार साकारताना महेश लिमये – संगीत, ओंकार मोहिते, हर्षल कटके – प्रकाशयोजना, प्रदीप व तन्मय- तंत्र सहाय्य, वृषाली चितळे लेले – वेशभूषा,अबोली थत्ते-रंगभूषा , कुशल दाभोळकर – वाद्यसंयोजन यांची सुरेख साथ दिली. शुभारंभाच्या प्रयोगाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सिनिअर काॅलेज यांचे सहकार्य लाभले. निर्मिती सहाय्य श्री. आनंदस्वरूप व सौ. वर्षा रणदिवे यांनी केले.

समारोपात मान्यवरांच्या हस्ते रश्मी देव व सहका-यांचा सत्कार करण्यात आला. “देवी” चा प्रयोग इंदोर येथे साजरा करण्यास स्नेह संस्था सज्ज असून या नाट्याचे 300 प्रयोग महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संस्था व संघटनां मार्फत सादर करणार असल्याचा संकल्प रश्मी देव यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधीशि बोलताना व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे