Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगभंडारामहाराष्ट्रविदर्भ

पवनीत ‘ओबीसी’ रकाना नसल्याने भोजापूर ग्रामस्थांचा जनगणनेवर बहिष्कार

तहसीलदार, तलाठी व प्रगणकास ग्रामपंचायत तर्फे निवेदन

0 5 7 7 4 5

‘ओबीसी’ रकाना नसल्याने भोजापूर ग्रामस्थांचा जनगणनेवर बहिष्कार

दोनही प्रगणकास जनगणना करण्यास केला मज्जाव

तहसीलदार, तलाठी व प्रगणकास ग्रामपंचायत तर्फे निवेदन

पवनी/भोजापूर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पवनी/भोजापूर: (ता.२५ मे सोमवार) भंडारा जिल्हातील पवनी तहसिल अंतर्गत असलेल्या भोजापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे आज (दि २५) जनगणनेवर ‘ओबीसी’ चा रकाना भारतीय जनगणना एप्समध्ये नसल्याने बहिष्कार टाकण्यात आला.

ग्रामपंचायत भोजापूर व गट ग्रामपंचायत सिंदी या दोनही गावातील गणनाघर संख्या मोजण्यासाठी दोन प्रगणकाची नेमणूक करण्यात आली आहे. आज प्रगणक प्रवीण पडवाल हे जनगणना करण्यासाठी पहाटेच गावात दाखल झाले असता, प्रथमत: सिंदी येथील ग्रामस्थांनी माहिती देण्यास नकार दिला. सरपंच सीमाताई पडोळे यास ग्रामस्थांनी सूचना दिली असता भोजापूर येथीलही ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जनगणनेवर बहिष्कार टाकत प्रगणक पडवाल यांना जनगणना करण्यास मज्जाव केला.

दरम्यान, प्रगणक यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) विशाल जाधव यांना त्वरीत सूचना देत तलाठी कार्यालयात बोलवून घेत बहिष्काराबाबत माहिती दिली असता, जाधव यांनी त्वरीतच तहसील कार्यालय पवनी येथे बहिष्कारासंबधी माहिती पाठवली.

सरपंच सीमाताई पडोळे व ग्रामस्थ यांनी तलाठी कार्यालयात येऊन प्रगणक प्रवीण पडवाल व तलाठी विशाल जाधव यांनी ग्रामपंचायततर्फे बहिष्काराचे लेखी निवेदन दिले. याप्रसंगी राजेश पडोळे, राहुल पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे