0
4
8
2
9
3
बालकविता
चांदोबा चांदोबा
फिरतो आकाशी
दिसतो का रे तुला
आम्ही पृथ्वीवासी
कधी कधी जातो
ढगाआड लपून
येते का तुला रडू
आई मारते म्हणून
कसं रे तुझ घर
पाहायच मला
कसा येऊ वर
नाही पंख झुला
तुच ये खाली
भेटाया धरेवर
तुप रोटी देईल
आवडेल ती खरं
पौर्णिमेच्या दिवशी
गोल दिसतो छान
आकार तुझा कसा
होतो लहान लहान
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
0
4
8
2
9
3



