Breaking
पश्चिम महाराष्ट्रपुणेराजकिय

शिवाजीनगर मतदार संघातील मतदारांसाठी, नावनोंदणीची विशेष मोहीम

जागरूकतेने सहभागी होण्याचे आवाहन

0 4 8 2 8 4

शिवाजीनगर मतदार संघातील मतदारांसाठी, नावनोंदणीची विशेष मोहीम

जागरूकतेने सहभागी होण्याचे आवाहन

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे.दि.(प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहीलेल्या शिवाजीनगर मतदारसंघातील मतदारांसाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

या मतदारसंघात डेक्कन जिमखान्यापासून प्रभात रोड- ८ वी गल्ली, कोहिनूर मंगलकार्यालयापर्यंत आणि डेक्कनकडून प्रभात रोडची संपूर्ण उजवी बाजू शिवाजीनगर मतदार संघातच येते. याखेरीज भांडारकर रोड, बीएमसीसी रोड, सेनापती बापट रस्ता, हनुमान नगर, पांडव नगर, फर्ग्युसन रस्ता, आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता या भागातील नागरिक वरील सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या सहकार्याने ही नावनोंदणी शुक्रवार दि. ५ जुलै व शनिवार दि. ६ जुलै रोजी सकाळी १० ते २ या वेळात नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या कार्यालयात भारती निवास चौक येथे करण्यात येईल. यामध्ये नव्याने मतदार नोंदणी, 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रथम नवमतदारांची नोंदणी, नावातील दुरूस्ती,नाव नोंदणी अथवा नाव वगळणे ही सर्व कार्यवाही या मोहीमेत करण्यात येईल. आधार कार्ड,पॅन कार्ड, एक रंगीत पासपोर्ट साईज फोटो,इत्यादी अधिकृत कागदपत्रे आणि ओटीपी साठी स्वतःचा मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे.

वर्षानुवर्ष मतदान करणा-यांना ऐन मतदानाच्या वेळी आपले नाव यादीतून वगळले गेल्याचा दुर्दैवी अनुभव लोकसभा निवडणुकीच्या वेळी आला. अक्षरशः एकेका यादीत एक दोन नव्हे तर शे-दोनशे लोकांची नावे गायब झाल्याचे आढळून आले. त्याचा फटका राजकीय पक्षांनाही बसला. विशेषतः पुणे शहरात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची सर्वत्र चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता तरी लोकांनी सावध होऊन आपले मतदार यादीतील नाव तपासून खात्री करून घ्यावी तसेच ज्यांना आपले नाव “वगळले असल्याचे” आढळून आले आहे, त्या सर्व लोकांनी आवर्जुन या विशेष मोहीमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ- भारती निवास चौक,
“सकस” शाॅप शेजारी
दिनांक- ५ व ६ जुलै
(शुक्रवार व शनिवार)
वेळ- सकाळी १० ते 3

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे