कविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
एकजीव; वर्षा मोटे-पंडित
0
4
8
2
9
0
एकजीव
तू माझा गंध बन
मी वाऱ्याचा स्पर्श होईल
तू सरीचा थेंब बन
मी जमिनीचा ओलावा होईल…
तू माझी चाल बन
मी तुझा ठसा होईल
तू श्वासातील मिठी बन
मी तुझी जीवन सखी होईल…
तू चांदण्याची झळाळी बन
मी रात्रीचा गारवा होईल
तू पानांची सळसळ बन
मी झाडावरचा पारवा होईल…
तू माझं गाणं बन
मी तुझा सुर होईल
तू माझे स्वप्न बन
मी तुझा नूर होईल…
तू माझे फुलपाखरू बन
मी त्याचे रंग होईल
तू माझा महासागर हो
मी एक जीव सरिता होईल…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
==========
0
4
8
2
9
0



