0
4
8
2
9
0
जिजाऊ हवी होती
सुखी होती रयत
आता मात्र भीती
गल्लीगल्लीत एक
जिजाऊ हवी होती
दिवसाला बलात्कार
डोळे झाकून पाहती
चौरंग करण्यासाठी
जिजाऊ हवी होती
पुण्याचे शेतशिवार
घेतला नांगर हाती
अंधश्रद्धा रोखणारी
जिजाऊ हवी होती
हेरुन कौशल्य मावळा
शिकवली युद्धनीती
दिशा बेधुंद तरुणाईला
जिजाऊ हवी होती
धन्य ती राष्ट्रमाता
घडवी दोन छत्रपती
सुसंस्कार देण्यासाठी
जिजाऊ हवी होती
बळवंत शेषेराव डावकरे
जि.नांदेड
0
4
8
2
9
0



