0
4
8
2
9
7
शिवबा
जयंती आली शिवबा राजाची
आनंद झाला जनतेला
जाणता राजा एकच झाला
शिवराय छत्रपती यांचा बोलबाला
सय्यद बंडाचा पट्याचा वार
घेतला जिवाने अंगावर
होता जिवा म्हणून वाचला शिवा
मावळे होते उदार जीवावर
घोडखिंडीत बाजीप्रभू
सिद्दीशी निकराने लढला
बाजींच्या पराक्रमाने
पावनखिंड नाव पडला
कोंढाण्याला सर करण्याला
तानाजी ,सूर्याजी संगे गेला
शत्रूशी लढता लढता
तानाजी धारातीर्थी पडला
स्वराज्य स्थापन करण्या
मावळे होते स्वामिनिष्ठ
शत्रूशी लढले, झुंजले
आजन्म राहिले एकनिष्ठ
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
======
0
4
8
2
9
7



