आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध
रंगात तुझ्या
विष्णू संकपाळ बजाजनगर जि.छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
3
रंगात तुझ्या
आज रंगात तुझ्या रे
असा रंगलो वेगळा
तुज सारखा जाहलो
घननिळा मी सावळा… //
मन मोहना गोपाळा
असे भाव माझा भोळा
रंग खेळता खेळता
रूप साठविले डोळा.. //
सारे विश्व तुझ्या रूपी
आज भासते सावळे
सागर ही निळा निळा
जसे नभ निळे निळे.. //
गोप गोपिका गोकुळी
गाई वासरे सावळी
वृंदावनी खेळी मेळी
निळी मोर पिसे भाळी.. //
बाधा ही जगावेगळी
चिंब राधेची काचोळी
तुझ्या निळ्या नेत्रतळी
जणू डुंबते मासोळी.. //
काम, क्रोध,मद,मोह
जाळी मूळ पिचकारी
जिवा शिवा गळामिठी
राहो अभंग श्री हरी.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
3



