
0
4
8
2
9
4
गौतम बुद्ध
जगाला शांततेचा संदेश
दया क्षमा शांतीचा प्रसार
असत्याला सत्यानं जिंकणं
गौतम बुद्ध स्वार्थ विचार
त्रिगुणी वैशाख पौर्णिमेस
तथागत मयूर वाणीने
राव रंक झाली प्रेममय
उजळे आयुष्य गौतमाने
तत्व धर्मचक्र पावित्र्याचे
प्रज्ञाशील बुद्ध पौर्णिमेचा
भगवान बुद्ध त्याग मूर्ती
दीपस्तंभ ठरला जगाचा
पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ
झाली त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती
शांती त्यागाचे प्रतीक बुद्ध
बुद्धांना मिळे ज्ञानाची शक्ती
वैज्ञानिक दृष्टिकोन ज्ञान
हिंसेपासून राहावे दूर
मनात नसावा अहंकार
ज्ञान सत्याचा प्रचार कर
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
===========
0
4
8
2
9
4



