
0
4
8
2
7
6
अडधडा
झिमूर झिमूर पाण्यात
ढग वाजते गडागडा
नाल्या बोड्या भरण्यासाठी
धावत आल्या अडधडा…
दवं भरते आंगात
पाण्यासंगा थंडा वारा
चिखलाच्या बांदीमंदी
डोलते हिरवा परा…
खुशी देते सर्वालं
अडधडाचा पाणी
शेतकऱ्याच्या बांधावर
रोवण्याची गाणी…
निसर्गाचं चक्र बिघडलं
आयत्या कामात खोडा
आता पयलेसारख्या
पडत नाही अडधडा
पडत नाही अडधडा…
सौ.आशा कोवे गेडाम
वणी जि.यवतमाळ
========
0
4
8
2
7
6



