0
4
8
3
0
0
साथ
अबोल प्रीतीत माझ्या
नको जाऊ बावरून
प्रेमभाषा ती अव्यक्त
घे ना गडे समजून.
अंगी नसे अवगुण
असे मध्यम तरुण
तुझे सौंदर्य मनोहर
ठेवा अमुल्य जपून
नसे कशाचीही कमी
दाटे संपत्ती या घरी
फक्त उणीव ती तुझी
भरूनीया काढ पोरी.
गोड बोल ना जराशी
बंधनास नको तोडू
पुढे पाऊल तु टाक
आता नाते नवे जोडू.
जपल्यात हृदयामध्ये
ओल्या नाजुक शपथा
मज दिलासा देऊनी
संपवून टाकू कथा.
दीपककुमार सरदार
ता.लोणार जि.बुलढाणा
=======
0
4
8
3
0
0



