Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सेवानिवृत्त शिक्षिका सुनिता गावंडे ठाकरे यांचा सत्कार समारोह

गोटाळी मालेवाडा येथे सत्कार सोहळा उत्साहात

0 4 8 2 8 6

सेवानिवृत्त शिक्षिका सुनिता गावंडे ठाकरे यांचा सत्कार समारोह

गोटाळी मालेवाडा येथे सत्कार सोहळा उत्साहात

रजत डेकाटे, प्रतिनिधी
मालेवाडा/ भिवापूर, बिनधास्त न्यूज

नागपूर/भिवापूर: गोटाळी मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुनिता गावंडे ( ठाकरे) यांचा गोटाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सेवानिवृत्ती सत्कार समारोह सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबराव अंभोरे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मालेवाडा येथील सरपंच राखी इंगोले, उपसरपंच फुलचंद मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष माधुरी करकाडे या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

यावेळी केंद्र पहामी वतीने शिक्षिका सुनिता गावंडे (ठाकरे) तसेच त्यांचे पती रामाजी गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वरभाऊ जगताप यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सुनिता गावंडे या सत्कारमूर्तीचे जीवन परिचयावर प्रकाश टाकला. त्यांचे कार्य विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना समजावून सांगितले.

सेवानिवृत्त होणे म्हणजेच प्रत्येकाच्या नशिबी नसते.जे शासनाचे अधिकारी म्हणून कार्यरत असतात त्यांना कधीतरी त्या कार्यापासून दूर होऊन प्रत्येकाचे काम करणे गरजेचे असते. तोच क्षण शिक्षिका सुनिता गावंडे (ठाकरे) यांच्या नशिबी आला. शिक्षिका गावंडे यांनी अहोरात्र शिक्षणाची ओढ विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लव्हे मुख्याध्यापक शाळा गोटाळी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गिरडे मुख्याध्यापक उखळी यांनी तर आभार गिरडे यांनी मानले. यावेळी पहामी केंद्र प्रमुख टेंभुर्णे सर, विजय मेश्राम, वरघणे सर, वासुदेव खोंडे, पडोळे, आहे राऊत सर, शिक्षिका शिला रोडे, वर्षा चापले,वर्षा कश्षप, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष रामू कडू, तसेच गावातील नागरिक विनोद बावणगडे यावेळी सर्व शिक्षकवृंद व गावातील नागरिक मोठ्या उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे