कविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
देव अंतरी आहे
पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर,जि.पुणे

0
6
4
5
1
8
देव अंतरी आहे
देव अंतरी आहे
मनी ठेवा विश्वास
नका फिरू दारोदारी
सत्कर्माचा धरा ध्यास
कुणी म्हणे देव देवालयी
कुणा वाटतो देव्हारी
डोकावून पहा जरा
देव वसला अंतरी
देव वसे चित्ती सदा
त्याचे करावे पूजन
सत्कर्माची आराधना
हेच त्याचे भजन
दुःखितांचे दुःख दूर करावे
दिनांना आधार द्यावा
देव वसला त्या ठायी
तया अंतरी तो पहावा
देवाचा आशीर्वाद आपल्या
मस्तकी असतोच नेहमी
सदाचार बाणवून अंगी
त्यासी भजावे अंतर्यामी
लक्षात ठेवा नेहमी
देव अंतरीच राहे
बर्या वाईट कर्माचा
तोच साक्षीदार आहे
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर,जि.पुणे
0
6
4
5
1
8



