Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

किल्ले मलंगगड

सौ. स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

0 4 8 2 8 6

किल्ले मलंगगड

मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने तिसऱ्या शतकात बांधला. बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने ओळखले जाते. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर, समाधी मंदिराचा घुमट असून त्याच्यावर कळस आहे याच कळसावर चांदीचा मत्स्य आहे, मंदिरात मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे.

कल्याणहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. पायथ्यापर्यंत रिक्षाची सोय आहे. गडाच्या निम्म्या उंचीवर कानीफनाथ समाधीस्थळ, त्याच्या पूढ़े जालंदरनाथ समाधी आणि सर्वात वर सुप्रसिद्ध श्री मलंगनाथांची समाधि आहे. तिथपर्यंत पायऱ्या आहेत. वाटेत एक देवीचे मोठे मंदिर आणि शंकराचे लहान देऊळ आहे. वरच्या बाजूला श्री गणपती, मारुतीचे स्वयंभू मंदिर आहे. मलंग समाधीस्थानाच्या अलीकडे दुकान रांगेतून एक वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर जाते. पधंरा वीस मिनिटांत पहिला चढ पार करून वरच्या उभ्या कड्यापाशी पोहचता येते.

माचीवरून सरळ पुढे जात पलीकडचे टोक गाठायचे. तेथून एका चोर वाटेने खाली उतरले की गडाच्या निम्म्या उंचीवर एक आश्रम लागतो. तिथून गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाच्या दिशेने वळसा घेत जाणाऱ्या वाटा निघतात. पहिली वाट खाली वावंजे गावात जाते. तेथून पनवेलला जायला एस टी मिळते. उत्तर दिशेच्या वाटेने गेले की दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गडाला वळसा घालून पालखीसारख्या आकाराच्या खडकाखालून किल्ल्यावर जाते. उजवीकडे खाली उतरणारी वाट मलंगगड व गणेश कार्तिक सुळक्यांचा डोंगर यांच्यामधील खिंडीत पोहचते. माचीवरून बालेकिल्याकडे जाण्यासाठी कडा उजवीकडे ठेवत वळसा घालून गेले की खोदीव पायऱ्या दिसतात. पायऱ्यापुढे एक गुहा व पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाण्यासाठी पायऱ्या तुटलेल्या आहेत.

तो भाग चढण्यासाठी दहा बारा फुटांचा एक पाईप आडवा टाकलेला आहे आणि हातांच्या आधारासाठी दोर लावला आहे. हा अवघड टप्पा पार करून दहा मिनिटांत गडमाथ्यावर पोहचता येते. माथा तसा लहान आहे. छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा दिसतो. त्याच्या मागे खोदलेली सात टाकी आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी श्रीगणेश मंदिर आहे आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. पूर्वेकडून नैर्ऋत्येकडे गोरखगड, राजमाची, माथेरान, पेब, इर्शाळ, प्रबळगड हा परिसर दिसतो.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
मुख्य सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
==========÷÷÷÷÷÷÷÷÷÷

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे