Breaking
कवितामराठवाडासाहित्यगंध

श्रावण सरी

प्रकाश पुंडलिक गोधने बाचोटीकर ता.कंधार जि.नांदेड

0 4 8 2 9 0

श्रावण सरी

हिरव्या डोंगर माथ्यावरी
कोसळता श्रावण सरी
सांडला सप्तरंगाचा सडा
ती निखळ हासल्यावरी

गर्द झाडी नटली सारी
फुलपाखरे फेर धरी
मधमाशा पिंगा घालती
खळखळणाऱ्या झऱ्यावरी

विजांचा थयथयाट नभी
ढग नाचती वाऱ्यावरी
गंध मातीचा मनात आत
साठवून घ्यावा उरि अंतरी

धरणीच्या मुक्त अंगणात
मयूर नाचरा ताल धरी
पक्ष्यांच्या ईवल्या चोचीतून
स्वर छेडते बघ बासुरी

कोण बावरी अंगावरी
झेलते पावसाच्या सरी
थेंब घेते अलगद चुंबन
तीच्या निखळ गालावरी

इंद्रधनुच्या सप्तरंगात
नटली धरणी सारी
उन कोवळे पीवळे ढवळे
चमकते डोंगर शिरावरी

तृप्त होते धरणी माता
कोसळता सरिवर सरी
हर्षित होते माती सारी
दव थेंबाचे पाना फुलावरी

प्रकाश पुंडलिक गोधने
बाचोटीकर ता.कंधार जि.नांदेड
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे