Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध

आयुष्यात पहिल्यांदाच

सुमितकोहळे ता. सावली जि चंद्रपूर

0 4 8 2 8 6

आयुष्यात पहिल्यांदाच

आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी ‪मनापासून‬ आवडलं होतं
खरचं तिच्यावर मी मनापासून प्रेम केल होत…!
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त ‪‎मैत्रीच‬ नातं होत,
नंतर मात्र तिच ‪वागणं बोलण‬ मला आवडत गेलं होतं…

‪‎आयुष्यात‬ पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून आवडलं होत…!
एके दिवशी सकाळी
तिला ‪माझी बनशील का‬ असं विचारल होतं…?
तिने मात्र उत्तर ‪न‬ देताच
निघणं पसंत केलं होतं..

आयुष्यात ‪‎पहिल्यांदा‬ कोणीतरी
मनापासून आवडलं होतं..!
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर
‪‎नाही‬ असं दिलं होतं,
मैत्रीच नातं मात्र पुढे चालू ठेवीन
असं सांगितल होतं…

आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून ‪आवडलं‬ होत…!
हळूहळू मात्र तिच्या मैत्रीचं ‪‎गोड विष‬
प्यावं लागत होतं,
विसरता येत नाही म्हणून मैत्रीवर समाधान
मानावं लागत होतं…

आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून आवडलं होत…!
नंतर मात्र आयुष्य संपवावस‬ वाटत होत,
पण तिला दोष लागेल म्हणून
तेही ‪‎जगावं‬ लागत होतं…

आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी
मनापासून आवडलं होतं…….!
इतरांसाठी मात्र माझ प्रेम ‪‎एकतफी॔‬ होतं,
पण मी मात्र तिच्यासाठी
प्रेम ‪साठवून ठेवलं होतं…….!

सुमितकोहळे
ता. सावली जि चंद्रपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे