0
4
8
2
8
4
दुभंगली धरणी माय
वरूणराजा बसला रूसून
शिवार काही पिकलं नाही
माझा घरधनी बळीराजा
गेला फासावर डोळे मिटून
राबराब राबती कर माझे
वावराच्या या तुकड्यामधी
पोसतिया घरदार सारं
हाडांची काडं करून
ठेचाळला पाय माझा
फाटकीच वहाण पायामंधी
त्यात धसला बाभळीच्या काटा
रंगत वाहिले भळभळत
भळभळणा-या अंगठ्यासम
नशीबही माझे भंगले
माझी दुर्दैवी व्यथा बघून
धरणीमायचेही मन दुभंगले
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
8
4



