आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
अस्तित्वासाठी
वृंदा(चित्रा)करमरकर
0
4
8
2
8
6
अस्तित्वासाठी
टाक तोडूनी बेड्या पदीच्या
झेप घेई तू क्षितीजापार
तुझ्या अस्तित्वासाठी नारी
हिंमतीने तू लढ गं अपार
शौर्याचे स्फुल्लिंग चेतवून
पेल सारी गे तू आव्हाने
अत्याचाऱ्यांना काढ ठेचूनी
रागिणी जग ताठ मानेने
नको आता झुरणे रडणे
विद्या भूषित हो मनस्विनी
स्वयंसिद्धा तूच मानिनी
कुटुंबाचा आधार भामिनी
पंख पसरून कर्तृत्वाचे
काबीज कर तू यशशिखर
आत्मज्योत मनी तेवू दे
नारी स्वतःला सिध्द कर
तूच अहिल्या तू जिजाऊ
इतिहास तुझा घडव नवा
अस्तित्वाने तुझ्या उजळो
दिशांमध्ये प्रकाश नवा
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
========
0
4
8
2
8
6



