Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

माणसातला देव

प्रकाश पुंडलिक गोधने

0 4 8 2 8 6

माणसातला देव

माणसा माणसा कसे कळेना तुला
कोरोनाने सर्व जगाला एक संदेश दिला,
संकटकाळी कुठलाच देव कुठेच धुवून नाही आला
प्रसंगी माणूसच माणसासाठी देव होऊन आला..!!१!!

नाशिवंत देह तुझा तू किती सजवलं त्याला
नश्वर ते जमवण्याचा आयुष्याभर अट्टहास केला
काल माझं माझं म्हणणारा माणूस
इथेच वैभव सारे सोडून गेला..!!२!!

जेंव्हा भाऊ बहिण पत्नी मुले
नातेवाईकांनीच शूद्र केले तुला,
जातीयता शिवाशिव काय असते
तेव्हा नक्कीच कळले असेल तुला…!!३!!

नवसाला पावनारा कोनताच देव
संकटात गाभाऱ्याच्या बाहेर नाही आला,
तू रस्त्यावर बेवारस तडफडताना
माणूसच तुला रुग्णालयात घेऊन गेला तुला…!!४!!

अति तिथे माती प्रचिती आली असेल तुला
सांगता येत नाही निसर्ग कधी कोणता घालीन घाला,
कुणाचीच भविष्यवाणी रोखू शकत नाही त्याला
अदृश्य किटानूने माणसातला माणूस जागा होता केला..!!५!!

प्रकाश पुंडलिक गोधने
बाचोटी ता. कंधार. जि. नांदेड
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे