0
4
8
2
9
3
भीमजयंती
अरे घरोघरी अन रस्त्यावरी,
गावोगावी बघा किती गर्दी झाली।
आज माझ्या भीमाची जयंती आलीः।।
माझ्या भीमाची जयंती आली …..
चला जाऊ चला, सारे घाई करा,
निळे झेंडे तुम्ही,हातोहाती धरा ।
टिळे लाऊनी घेऊ ,निळे कपाळी.
आज भीमाची जयंती…..
चैत्राचे आकाशी,जमले चांदणे।
अंगणी सजले,छान रांगोळीने।।
घरोघरी दारी, तोरणे बांधली..
आज भीमाची जयंती….
मिरवणुकी काढू,जयभीम बोलू।
हर्ष उल्हासाने,आनंदाने डोलू ।।
दिन हाच दसरा आणि दिवाळी…
आज भीमाची जयंती…
ते राज जंगली,हाणू पाडू आता।
भीमावाणी दुजा,नाही कोणी दाता।।
रक्षू गोवर्धना,लोकशाही प्रणाली..
आज भीमाची जयंती..
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.
=======
0
4
8
2
9
3



