Breaking
कवितानागपूरनांदेडमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

मखमली स्वप्न

अनुराधा बाबाराव भुरे,नांदेड

0 4 8 2 9 7

मखमली स्वप्न

पोशिंदा मी या जगाचा
म्हणतात मला बळीराजा
उपेक्षिताच जीवन जगतोय
जगणच होतय आज सजा

शेतकरी कुटुंबातील जन्म
दारिद्र्य पाचवीला पुंजलेल
लहानपणापसूनच बघतोय
बापाला कामात जुंपलेल

शिक्षण घेतल ,मोठा झालो
वाटलं मिळेल हाताला काम
कुटुंबाला हातभार होईल
मायबापाच फिटेल पांग

पण सामान्य बुद्धिमत्तेला
कुठे आहे आजकाल वाव?
धंद्यासाठी भांडवल नाही
कसं कुठे कमवू नाव?

वय झालं लग्नाचं आता
इथ मुलींकडून येतो नकार
तुटपुंज्या शेतीत होत काय
कसं घेईल भविष्य आकार

इतरांसारखे रंगवले होते मी
मखमली स्वप्न संसाराचे
सुंदर रेशीम बंधनातील
सप्तजन्मीच्या त्या नात्याचे

मी शेतकरी मुलगा म्हणून
समाजच नाकारतो मला
विवंचनेत जगणाऱ्या शेतकऱ्याची
किंमत कळेल का जगाला?

अनुराधा बाबाराव भुरे,नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे