Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेविदर्भसाहित्यगंध

चला पर्यटनाला…!! गणपतीपुळे

0 4 8 2 9 4

चला पर्यटनाला…!! गणपतीपुळे

रत्नागिरीपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेले गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. आध्यात्मिक व नैसर्गिक वारसा लाभलेले हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे मंदिर आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते.

१ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. पश्चिमेला अथांग समुद्र, लाटांशेजारी लांबलचक पुळणं, मंदिराला मागून हिरवाईचा साज घातलेला डोंगर, व मंदिर परिसरातील शांतता.. यामुळे इथं येणाऱ्या प्रत्येकाला वेगळीच अनुभूती मिळते.

गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. सुंदर समुद्रकिनारा व स्वयंभू गणेशामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. येथे दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. चाफे गणपतीपुळे ह्या मार्गाने जाताना गणपतीपुळे जवळच एक छोटेसे कातळशिल्प आहे. येथून जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळ सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड हे कवी केशवसुतांचे गाव आहे. ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हणले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे. त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ‘आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे. आरे आणि वारे हे दोन‌ समुद्रकिनारे एकाच डोंगराच्या दोन बाजूस आहेत. डोंगरकड समुद्रात प्रवेश करते त्यामुळे समुद्राचे विभाजन होते. या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूनेच गणपतीपुळेला जाणारा रस्ता आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा आहे.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे