
0
6
4
5
4
9
स्पष्टोक्ती
मानवा जीवन मिळते एकदाच
करू नये त्याला जाणून बुजून
अवघड जगताना आत बाहेर
असावे आपले मन सारखे
स्वार्थाने मिळते क्षणिक प्रेम
समाधान अन् शांती चेहराही
दिसतो बेगडी डोळेही बोलतात
मनातले कपटी भाव सारे
सारे काही स्पष्ट झाल्यावर
दूर जातात आपलेही
नसतो कुणाला विश्वास फिरते
संशयाची सुई आपल्यावर
नको घालूस पत आपल्या इभ्रतीची
असू दे स्पष्टोक्ती जीवनी
काया वाच्या मनाची शुद्धता
तेव्हाच लाभेल खरे सुख समाधान
गजवंती सुभाष विघ्ने
बडनेरा, जि.अमरावती
========
0
6
4
5
4
9



