Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

महानुभाव पंथीय उपवर वर-वधु परिचय मेळावा संपन्न

रजत डेकाटे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

महानुभाव पंथीय उपवर वर-वधु परिचय मेळावा संपन्न

रजत डेकाटे, प्रतिनिधी

नागपूर: स्वामीदर्शन महानुभाव मंडळ, नागपूर द्वारा आयोजित महानुभाव पंथीय उपवर वर-वधु परिचय मेळावा आज रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री संत रविदास सांस्कृतिक भवन क्रीडा चौक, हनुमान नगर, नागपूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री तेजेन्द्रकुमार गजभिये, निरीक्षक, वैधमापन शास्त्र अधिकारी, नागपूर हे लाभले होते तर मेळाव्याचे उद्घाटन श्री प्रकाश गजभिये, डायरेक्टर, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नवी दिल्ली यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून श्री अशोकराव खांडेकर, माजी नगररचनाकार, मुंबई व प्रभाकर चंदनखेडे माजी मंडल अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष तेजेंद्र गजभिये यांनी मंडळाद्वारे वर वधू परिचय यासारखे अशा प्रकारचे उपक्रम ही पंथातील समाजसेवाच होय असे प्रतिपादन केले. उद्घाटक प्रकाश गजभिये यांनी महानुभाव पंथातील विवाह विषयक समस्येसाठी अशा मेळाव्यांची प्रासंगिकता महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केले. तर अतिथी अशोक खांडेकर यांनी पंथातील श्रद्धा व प्रामाणिकपणा चे महत्व विशद केले.

सौ धनश्री थोरात यांनी प्रास्ताविक तर सौ कोमल बोरकर यांनी संचालन केले. आभार सौ श्रद्धा चौधरी यांनी मानले. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व जातींतील महानुभाव पंथीय विवाह इच्छुक युवक युवतींनी सहभाग घेतला होता; ज्यात शेतकरी, सरकारी व खाजगी नोकरदार, व्यवसायिक, कामगार या सर्व प्रकारातील विवाहेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज बोरकर, राजेंद्र कपाटे, भूपेश शेंडे, राहुल शेंडे, प्रभाकर बोरकर, बबन डोंगरे, स्नेहल गजभिये, यशोदा निमगडे, रेशेंद्र उके, विनोद गजभिये, गुणवंत रंगारी, देवराव मोटघरे चंद्रकुमार शेंडे, खुशाल गजभिये, पुष्पा मोटघरे यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे