Breaking
ई-पेपरकविताकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणे

आठवणींच्या वहीत

पांडुरंग एकनाथ घोलप

0 4 8 2 4 4

आठवणींच्या वहीत

आठवणींच्या वहीत होती
काही पाने चुरगळलेली
आठवणी ताज्याच होत्या
संवेदना होती मरगळलेली

आठवणींच्या वहीत होती
स्वप्ने बाळगलेली उराशी
इच्छा होत्या कुस्करलेल्या
अन् वेदनांच्या कैक राशी

आठवणींच्या वहीत होता
माझा लढवय्या बाणा
संकटांशी सामना करूनही
नाहीच मोडलेला कणा

आठवणींच्या वहीत होती
चित्रे सुखासीन आयुष्याची
आनंदानेच जगण्यासाठी
स्वप्ने यशस्वी भविप्याची

आठवणींच्या वहीत होता
फक्त ध्येयाचा ध्यास
अपुर्ण राहिलेल्या अपेक्षा
तरी उदंड आत्मविश्वास

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 4 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे