कवितानागपूरभंडाराविदर्भसाहित्यगंध
तथागताची वाणी
0
4
8
2
9
3
तथागताची वाणी
वैशाख पौर्णिमेच्या पुनवेला
रात्रीस चंद्र हसला
ज्ञानरवी युवराज जन्मला
युगायुगांचा अंधार दूर झाला
अजिंठ्याच्या लेण्यात
कोरली सुंदर मुर्ती
नाव त्यांचे सिद्धार्थ
जगभरात त्यांची किर्ती
संसार त्याग करून
दुःख घेतलं वाट्याला
भटकलेल्या वाट दाखवून
सम्यक विचारांचा मार्ग दिला
दिले वागणूकीचे धडे
असावे आचरण शुद्ध
प्रसार केला बुद्ध धर्माचा
झाला सिद्धार्थाचा गौतम बुद्ध
बसले ते ध्यानस्थ
पिंपळाच्या झाडाखाली
झाली दिव्य ज्ञानप्राप्ती
बोधीवृक्ष पिंपळाला संबोधती.
अर्चना राजू ईंकने
आरमोरी,गडचिरोली
==========
0
4
8
2
9
3



