ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
द्विधा मन
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे
0
4
8
2
9
0
द्विधा मन
कुरूक्षेत्रावर पाहून
युद्धास उभे आप्तगण..
काय करावे सुचेना
अर्जुनाचे द्विधा मन..!
नको नको रे मला
असे राज्य ते केशवा
कसं शांतवू मना
माझ्या मारून बांधवा..
येता मनी तो विचार
सुके पडले अधर..
धजेना तो हात माझा
उचलाया शर…
भांबावून गेलो
कळेना निती-अनिती
व्यर्थची वाटे आता
धर्म-अधर्माच्या गोष्टी..
तूच रे माधवा
सावर वेडे क्षण..
मार्ग दाखव आगळा
आवर द्विधा मन..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
0
4
8
2
9
0



