वैद्यकिय व विकी प्रतिनिधी १२ फेब्रुवारीच्या संपात होणार सहभागी
MSMRA च्या नेतृत्वाखाली संपाचे आयोजन
वैद्यकिय व विकी प्रतिनिधी १२ फेब्रुवारीच्या संपात होणार सहभागी
MSMRA च्या नेतृत्वाखाली संपाचे आयोजन
तमाम वैद्यकिय व विकी प्रतिनिधी हे १२ फेब्रुवारी च्या संपात सहभागी होणार : सचिव नितिन ढोबळे
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा केंन्द्रीय कामगार संघटना व ४४ औद्योगिक फेडरेशनच्या निर्णयानुसार तसेच एफ एम आर ए आय च्या आवाहनानुसार सीटू च्या नेतृत्वात खंडोबा मंदिर पासून सकाळी ठीक ११ वाजता. कॉटन मार्केट नागपूर येथून मोर्चा निघणार व संविधान चौकात धडकणार. या संपाच्या मोर्चात जवळजवळ 2000 लोकसंख्या सहभागी होतील. असे दिलीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
संविधान चौकात १२ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय एक दिवसीय संपाचे आवाहन करण्यात आलेले आहे. वैद्यकिय व विक्री प्रतिनिधीचे फेडरेशन हे हया अखिल भारतिय मंचामध्ये सामील आहे व प्रामुख्याने हा संप वैदयकिय व विकी प्रतिनिधीना लागु असलेल्या विक्रि संवर्धन कर्मचारी सेवा व शर्ती अधिनियम हा कायदा नवीन श्रम कोड बिलातुन वगळण्यात आलेला आहे. वैदयकिय व विक्री प्रतिनिधी हया संपामध्ये हया चार श्रम कोड बिल रद्य करा हया मागणीसह इतर खालील मागण्यांकरीता हया संपात सामील होत आहेत.
१. चार श्रम कोड बिल रद्य करा
२. सेल्स प्रमोशन एम्पलॉईज अँक्ट सेवा शर्ती पुर्नजिवित करा व वैदयकिय प्रतिनिधीच्या सर्वसामन्य कामकाजाचे वैधानिक नियम तयार करा.
३. आठ तासाचे कामासाठी ३०,००० रुपये किमान वेतन व १०,००० रुपये मासिक पेन्शन लागू करा, ईएसआय, पीएफ, ग्रॅच्युईटी, बोनस, वर्कमन कम्पेन्शेष्सन अँक्ट मधील वेतन मर्यादा यावरील सिलीग रथ करा.
४. सरकारी इस्पीतळ व आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधीच्या प्रमोशन साठी बंदी करणारा केंन्द्रीय सार्वजनिक आरोग्य खात्याचा जि.आर.करा व वैद्यकिय प्रतिनिधीच्या घटनादत्त रोजगार अधिकाराचे संरक्षण करा.
*औषध कंपन्यांकडील मागण्या*
१. औषध विकी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय प्रतिनिधीचा मानसिक छळ करणे व त्यासाठी नोकरीतून बडतर्फ करणे बदली करणे बंद करा.
२. इलेक्ट्रॉनिक गॅझेट व्दारा ट्रॅकिंग व सव्हीलन्स करुन वैयक्तिक गोपनियता व खाजगीपणावर अतिक्रमाण बंद करा.
MSMRA चे सचिव नितिन ढोबळे यांनी तमाम जनतेला व कामगारांना आवाहन केले आहे की, या संपाला समर्थन देऊन संप यशस्वी होण्यासाठी सहभागी व्हावे.



